ॲड.अकल्पिता चक्रदेव यांच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन ॲड. राजशेखर मलुष्टे यांच्या हस्ते
रत्नागिरी:ॲड.अकल्पिता चक्रदेव यांनी आपल्या सांसारिक आणि सामाजिक जबाबदाऱ्या सांभाळून मनापासून एल. एल. बी. चे शिक्षण पूर्ण केले. समाजातील पिडीत व गरजू पक्षकारांना विशेषतः महिला व बालकांना त्यांचे घटनादत्त व मानवी अधिकार मिळवून देण्यासाठी त्याचा उपयोग सुरु केला. त्यांचे वकिलीचे ऑफिस सुरु झाल्याने गरजू पक्षकारांची खूप सोय झाली आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ राजशेखर मलुष्टे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी समोरच्या आजगावकर वाडी येथे ॲड. अकल्पिता चक्रदेव यांच्या नवीन कार्यालयाचे उदघाटन ॲड. मलुष्टे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, अनेक पक्षकारांना त्यांनी उचित मार्गदर्शन केले. त्यांचे अधिकार मिळवून देण्यास मदत केली.
मध्यस्थता म्हणजे मेडिएशनचा कोर्स सुद्धा त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केला. त्या माध्यमातून अनेक मध्यस्थी प्रकारणे हाताळली. अनेकांचे संसार टिकविण्यात आणि व्यावसायिक करार टिकविण्यात खूप मोलाचे मार्गदर्शन केले. हे सर्व घरच्या कार्यालयातून आणि कोर्टाच्या आवारातून करत असत. आता आज त्यांचे वकिलीचे ऑफिस सुरु झाल्याने गरजू पक्षकारांची खूप सोय झाली आहे. ॲड.अकल्पिता चक्रदेव यांच्या व्यावसायिक कार्यास शुभेच्छा दिल्या.तसेच या प्रसंगी इन्फिगो आय केअर चे कार्यकारी संचालक डॉ.श्रीधर ठाकूर, केबीबीएफ ग्लोबल चे उपाध्यक्ष योगेश मुळ्ये आणि मेंबर्स, गो.जो. महाविद्यालयाच्या संस्कृत विभाग प्रमुख प्रा. डॉ. कल्पना आठल्ये, विश्व हिंदू परिषद कार्यकर्ते श्री. दिपक जोशी व सहकारी,अभाविप कार्यकर्ते, पावस ता. रत्नागिरी येथील अनसुया आनंदी महिला वृद्धाश्रमाचा कर्मचारी वर्ग, जीएसटी कार्यालयातील वरीष्ठ अधिकारी सौ. मोहना आंबर्डेकर अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांसहित अनेक लोकांनी शुभेच्छा दिल्या.
तसेच रत्नागिरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. निलेश माईनकर, सीए प्रसाद दामले, डॉ.मोहन गोगटे, , मलुष्टे स्टीलचे श्री. निलेश मलुष्टे तसेच रत्नागिरीतील वकील सहकारी व अन्य मान्यवर यांनीही आवर्जून उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.