
सावर्डेत एका कातभट्टीवर गुजरातच्या वनविभागाचा छापा.
सावर्डे परिसरातील एका कातभट्टीवर गुजरातच्या वनविभागाने छापा टाकून एक गोदाम सील केले आहे. खैराच्या तस्करी प्रकरणी गुजरात वनविभागाने एकाला ताब्यात घेतले होते. त्याने दिलेल्या माहितीनुसार गुजरात वनविभागाने सावर्डे येथील बड्या कात व्यावसायिकावर छापा टाकला आहे. दोन महिन्यात सलग दुसर्यांदा येथील कात व्यावसायिकावर बाहेरच्या वनविभागाने कारवाई केली आहे.
यापूर्वी गुजरातच्या ईडीने आदेश दिल्यानंतर नाशिक येथील वनविभागाच्या पथकाने सावर्डे येथे येवून एका कात व्यावसायिकावर कारवाई केली होती. सुमारे ९० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. तसेच अन्य दोन व्यावसायिकांची पाहणी करून त्यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. तसेच त्यांच्याकडे असलेल्या खैरांची चौकशी करून त्याबाबतचा अहवाल वरिष्ठांना देण्याची सूचना नाशिकच्या वनविभागाने केली होती.www.konkantoday.com