बसरा स्टार ठरलेय मिर्या बंधारा बांधणीत अडचण.
निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून रत्नागिरीच्या मिर्या किनारी गेली ६ वर्षे लाटांचा मारा खात बसरा स्टार जहाज आजही एकाच जागी अडकून पडले आहे. हे जहाज मिर्या धूपप्रतिबंधक बंधार्यावर टेकल्याने १९० कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या या बंधार्याच्या पुढील कामासमोर मोठी अडचण उभी आहे. कारण हे जहाज काढण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ बोर्डामार्फत त्या जहाजाच्या मालकाला दिलेली ६ महिन्यांची मुदतही टळून गेली आहे. त्यामुळे प्रशासनाने या भंगारात गेलेल्या जहाजाची विनाविलंब मोडणी करणे भार पडणार आहे.
मिर्या बंधार्याच्या अपूर्ण राहिलेल्या १,२०० मीटरच्या पांढर्या समुद्र ते जयहिंद चौकापर्यंतचा कामाचा टप्पा शिल्लक आहे. पावसाळा संपल्यानंतर पत्तन विभागाने ३ आठवडयापूर्वी ठेकेदाराची बैठक घेतली. लवकरात लवकर उर्वरित टप्प्याचे व बंधार्याच्या टॉपचे काम सुरू करण्याच्या सूचना ठेकेदार कंपनीला दिल्या आहेत. त्यानुसार संबंधित ठेकेदार कंपनीने त्या कामाचा मुहूर्त साधला, पण अजून रखडलेल्या कामाला गती मिळालेली नाही.www.konkantoday.com