
शासनाकडून मोफत धान्य पुरवठ्याला सुरुवात ,लांज्यात एकाच वेळी केली चारशे नागरिकांनी गर्दी
काेराेनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने आता मोफत धान्य पुरवठा करण्यास सुरुवात केल्याने हे धान्य घेण्यासाठी लांजामध्ये काल मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली त्यामुळे सुरक्षित अंतर ठेवण्याचा नियमांचा बोऱ्या उडाला शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करून गर्दी हटवली लांजा शहरातील या एकाच इमारतीत तीन रेशन दुकाने आहेत त्यामुळे काल हे धान्य घेण्यासाठी आजूबाजूच्या गावातील लोकांनी गर्दी केली होती एकाच वेळी जवळजवळ चारशेच्या वर लोक आल्याने ह्या इमारतीसमोरील पटांगणात मोठी गर्दी झाली हे लोक जवळ जवळ उभी असल्याने सुरक्षित अंतर ठेवण्याचा नियमही पाळला जात नव्हता शेवटी याप्रकरणी तहसीलदार व पोलिसांनी हस्तक्षेप करून गर्दी हटवून टप्प्या टप्प्याने धान्य वितरित करण्याचा निर्णय घेतला तसेच सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी चाैकोनही आखून देणेत आले
www.konkantoday.com