महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तसेच विविध सामाजिक संघटना व सामाजिक कार्यकर्ते थर्टी फर्स्ट ला ठिकठिकाणी दुधाचे वाटप करणार.
सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबरला सेलीब्रेशनच्या नावाखाली खास करून तरुण पिढी मध्ये मोठ्या प्रमाणात व्यसन वाढताना दिसत आहे. त्यामुळे थर्टी फर्स्ट ला प्रबोधन करण्यासाठी व व्यसनापासून अनेकांना खास करून तरुणांना दूर ठेवण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तसेच विविध सामाजिक संघटना व सामाजिक कार्यकर्ते थर्टी फर्स्ट ला ठिकठिकाणी दुधाचे वाटप करणार आहेत.अनेक तरुण-तरुणी ३१ डिसेंबरला व्यसनाचा पहिला अनुभव घेतात आणि पुढे जावून व्यसनाच्या आहारी जातात.
या पार्श्वभूमीवर 28 डिसेंबर ते 3 जानेवारी या कालावधी मध्ये महाराष्ट्र अंनिस मार्फत चला व्यसन बदनाम करूया या मोहिमे अंतर्गत ‘दारू नको दुध प्या!’ हा उपक्रम राज्यभर राबवला जाणार आहे अशी माहिती डॉ. हमीद दाभोलकर, राहुल थोरात, फारुख गवंडी, मिलिंद देशमुख, विनोद वायंगणकर, मुक्ता दाभोलकर, प्रकाश घादगिने, राजीव देशपांडे, नंदिनी जाधव, रामभाऊ डोंगरे, सम्राट हटकर, मुंजाजी कांबळे,अशोक कदमआणि संदेश गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.