पर्यटकांनी नववर्षी उत्साहात स्वागत करा मात्र नियम पाळून- जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी.
कोकणात नाताळच्या सुट्टीला व नववर्षाच्या स्वागताला पर्यटक झाले आहेत. जिल्हा पोलीस प्रशासनाकडून सगळ्या पर्यटकांचे स्वागत करण्यात आल आहे. पर्यटकांनी समुद्र सफारीला जाताना आवश्यक ती काळजी घ्यावी नववर्षाच्या स्वागतासाठी आलेल्या पर्यटकांचं त्यांनी स्वागत केल आहे. मात्र कोणीही दारू पिऊन गाडी चालवाल तर खबरदार कठोर कारवाई केली जाईल असाही इशाराही त्यांनी दिला आहे.
जिल्ह्यात सगळ्या ठिकाणी ब्रीथ अनालायझर टेस्टिंग होणार असून कोण दारू पिऊन सापडल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिला आहे. जिल्हा पोलीस प्रशासन नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाले अजून जिल्हाभरात अमली पदार्थांच्या वाहतुकीवर अवैध विक्रीवर ही करडी नजर ठेवण्यात आली आहेरत्नागिरी जिल्ह्यातील सगळ्या समुद्र किनार्यावरवरती आवश्यक तो पोलीस बंदोबस्त तैनात यांना करण्यात आला आहे.
जीवरक्षक यांनाही आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.समुद्र किनाऱ्यावर सूचना फलक लावण्यात आले आहेत. दापोली,गुहागर ,चिपळूण, रत्नागिरी आदी काही पर्यटनाची गलबजलेल्या ठिकाणांच्या येथे वाहनांची पार्किंग व्यवस्था वाहतूक व्यवस्था नियमन करण्यासाठी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली. सुट्टीचा आनंद व नववर्षाचे स्वागत सगळ्यांनी उत्साहाने व आनंदाने करा मात्र आवश्यक ती काळजी व खबरदारी घेण्याच आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केला आहे.