
म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची जिल्हावासियांना भेट रत्नागिरीसह चिपळुणात होणार म्हाडाची १८५० घरकुले
रत्नागिरी ः म्हाडाकडून रत्नागिरीमध्ये ७५० व चिपळूण येथे ११०० घरे उपलब्ध होणार आहेत. तसेच या दोन्ही ठिकाणी मिनी नाट्यगृहही उभारण्यात येणार असल्याचे म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी सांगितले.
रत्नागिरी व चिपळूण येथे या घरकुलांच्या वसाहती उभ्या केल्या जाणार आहेत. म्हाडाच्या घरकुलांसाठी ५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यातील रत्नागिरी शहरातील घरकुलांसाठी २० कोटींची तरतूद केली असल्याचे सामंत यांनी सांगितले.