
राज्य सरकारनं मेगाभरतीला स्थगिती दिली
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद पडलेले उद्योगधंदे आणि घटतं कर उत्पादन या कात्रीत अडकलेल्या राज्य सरकारनं ७० हजार जागांच्या रखडलेल्या मेगाभरतीला स्थगिती दिली आहे त्यामुळे राज्याची आर्थिक घडी पुन्हा व्यवस्थित बसत नाही तोपर्यंत राज्यात कुठल्याही प्रकारची नवी नोकरभरती होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. अर्थ मंत्रालयाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर सर्व विभागांच्या निधीला देखील कात्री लावली आहे. तसेच अनेक योजना रद्द करण्याचाही मोठा निर्णय घेतला आहे
www.konkantoday.com