न्यू इंग्लिश स्कूल, सैतवडे प्रशालेत क्रीडा महोत्सवाचे सरपंच साजिद शेकासन हस्ते उद्घाटन
रत्नागिरी : शैक्षणिक व सामाजिक संस्था, सैतवडे ता.रत्नागिरी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, सैतवडे प्रशालेत आयोजित केलेल्या दोन दिवशीय क्रीडा महोत्सवाचे साजिदभाईंच्या हस्ते उद्घाटन संपन्न-
शैक्षणिक व सामाजिक संस्था, सैतवडे संचलित न्यू इंग्लिश स्कूल ,सैतवडे प्रशालेत क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात करण्यात आले होते.सैतवडे गावचे प्रथम नागरीक ,सरपंच मा.साजिदभाई शेकासन यांचे शुभ हस्ते श्रीफळ वाढवून क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी शैक्षणिक व सामाजिक संस्था, सैतवडेचे ज्येष्ठ संचालक मा.लियाकत शेकासन तसेच संचालक मा.मुजफ्फर सय्यद तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सिद्धी लांजेकर आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्याध्यापिका श्रीम.सिद्धी लांजेकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी शुभेच्छा देताना सरपंच महोदयांनी शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्याकडे टी शर्ट व हाफ पॅन्टचे 50 स्पोर्ट कीट तसेच व्हॉलीबॉल नेट दिल्याबद्दल तसेच शाळेची कोणतीही समस्या दूर करण्याबाबत असलेल्या धडपडीबद्दल ऋण व्यक्त केले.