जिल्हा परिषद सीईओपदी पुन्हा किर्तीकिरण पूजार.
रत्नागिरी:- दोन दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पुणे विभागातील आण्णासाहेब चव्हाण यांची नियुक्ती झाल्याचे आदेश जारी करण्यात आले होते. मात्र नवीन आदेशानुसार आता पुन्हा किर्तीकिरण पूजार हेच जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कायम राहणार आहेत. नवीन आदेशानुसार आण्णासाहेब चव्हाण यांची नियुक्ती महात्मा फुले, जीवनदायी आरोग्य योजना सोसायटी, मुंबई येथे करण्यात आली