
समुद्रात परप्रांतीय मच्छिमार नौकांकडून मासेमारी सुरूच
रत्नागिरी: पावसामुळे जिल्ह्यातील नौका अद्यापही बंदरात असल्या तरीही जिल्ह्याच्या सागरी क्षेत्रात परप्रांतीय नौकांची घुसखोरी सुरू झाली आहे. खवळलेल्या समुद्राची पर्वा न करता काही परप्रांतीय नौका बेबी म्हाकूळवर डल्ला मारत आहेत. त्या नौका मच्छि उतरवण्यासाठी रत्नागिरीतील बंदरांचा आधार घेत आहेत. या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.
नियमानुसार नौकांनी आपल्या बंदरावर मासळी उतरवणे बंधनकारक आहे. असे असताना परप्रांतीय नौका मालक मिरकरवाडा येथे आपला माल उतरवत आहेत. माल उतरविण्यासाठी ते येथील स्थानिक दलालांची मदत घेत आहेत. मोठ्या प्रमाणावर मिळणारे कमिशन यामुळे ही परिस्थिती ओढवल्याचे मच्छिमारांतून बोलले जात आहे.
www.konkantoday.com