
हे मुकं, बहिरं, मंद बुद्धीचं लोकांची कामे करणार आहे का?” भास्कर जाधव यांची खालच्या पातळीवर टीका
राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यानुसार महायुती आणि महाविकास आघाडी तयारी करत आहे. दरम्यान, दोन्ही बाजूंच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रोजच झाडल्या आहेतदरम्यान यामध्ये आता गुहागरचे ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी उडी घेतली आहे. गुहागर मतदारसंघात भाजपा नेते विनय नातू व भास्कर जाधव यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत आहे. आता ग्रामीण रस्त्याच्या कामावरून या दोघांमधील वाद विकोपाला गेल्याचे पाहायला मिळत आहे. काही गावांमधील रस्त्याच्या कामाच्या श्रेयवादावरून भास्कर जाधवांनी आज आंदोलन केले. यावेळी त्यांनी माजी आमदार विनय नातू यांच्यावर टीका केली आहे. यावेळी त्यांची टीका करण्याची पातळी अगदी खालच्या स्तराला गेल्याचे पाहायला मिळाले.गुहागर-विजापूर मार्गावरील गुढे फाटा येथे आमदार भास्कर जाधव हे हजारो ग्रामस्थांसह आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले होते. यावेळी भास्कर जाधव म्हणाले, “२०१४ ते २०१९ पर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना विनय नातूंनी एक रूपया तरी आणला आहे का? असा प्रश्न जाधव यांनी उपस्थित केला. हे मुकं, बहिरं, मंद बुद्धीचं लोकांची कामे करणार आहे का?”आमदार भास्कर जाधवांनी देवेंद्र फडणवीसांवर देखील टीका केली आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध भास्कर जाधव संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. आंदोलनादरम्यान बोलताना आमदार भास्कर जाधव यांनी माजी आमदार विनय नातू, यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर देखील खालच्या पातळीत टीका केल्याचं पाहायला मिळाले. त्यानंतर पोलीस आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर भास्कर जाधवांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले.