
राजापूर शहरात बिबटयाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने लावला लोखंडी पिंजरा.
राजापूर शहरातील बिबटयाच्या मुक्त संचाराबाबत आमदार किरण सामंत यानी तात्काळ कार्यवाहीच्या वनविभागाला दिलेल्या सूचनांची राजापूर वनविभागाने अंमलबजावणी सुरू केली असून ज्या भागात बिबटयाचे दर्शन झाले त्या झरी रोड परिसरात बिबटयाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने लोखंडी पिंजरा लावला आहे.राजापूर शहर व परिसरात गेले काही दिवस बिबटयाचा मुक्त संचार सुरू आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत माजी नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी, सौ.साजीया काझी गिरकर व शिवसेना शहर प्रमुख सौरभ खडपे यांनी आमदार सामंत यांच्याकडे लेखी निवेदन देवून या बिबटयाचा बंदोबस्त करण्याबाबत वनविभागाला कार्यवाही करण्याच्या सूचना दयाव्यात अशी मागणी केली होती.