मच्छीमार क्षेत्रातील लाखो कामगार सरकारच्या कामगार व्याख्येत बसत नसल्याने लाभांपासून वंचितच.
मच्छीमार नौकांवर काम करणार्या खलाशांना कामगार कायदे लागू होत असल्याने शासनाने देऊ केलेले लाभ त्यांच्यापर्यंत पोहचत नाहीत, रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे २५ हजार तर राज्यभरात सुमारे दीड लाख लोक प्रत्यक्ष मच्छीमारी क्षेत्रात कामगार म्हणून कार्यरत आहेत. तथापि ते सरकारच्या कामगार व्याख्येत बसत नसल्याने त्यांच्या कल्याणासंदर्भात काहीही कारणे आवाक्याबाहेर असल्याचे कामगार खात्याने म्हटले आहे.
मच्छीमारी २ विभागामध्ये वर्गीकृत झाली आहे. एक म्हणजे समुद्रातील मच्छीमारी आणि दुसरी म्हणजे गोड्या त्याचप्रमाणे निमखारे, खाडी विभागातील मच्छीमारी होय. दोन्ही ठिकाणी काही प्रमाणात स्वतः मच्छीमार काम करतात तर काही ठिकाणी यांत्रिकी नौकांवर वेगवेगळ्या ठिकाणांहून बोलावलेले कामगार काम करत असतात असे कामगार मिळवणे आणि त्यांना कौशल्य मिळवून देणे, यासाठी नौका मालकांची नेहमी धावपळ उडत असते.
महाराष्ट्रात समुद्रातील मच्छीमारीसाठी स्थानिक लोक खलाशी म्हणून पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत. यासाठी ठाणे जिल्ह्यातील डोंगराळ आणि आदिवासी क्षेत्रातून मोठे मनुष्यबळ मागवले जाते. याशिवाय ओरीसासारख्या राज्यातून कुशल मच्छीमार बोलावले जातात. नेपाळहून आलेले गुरखेही मच्छीमारीसाठी पाठवले जातात. काही प्रमाणात ब्रह्मदेश किनार्यावरचे रोहिंगे लोक मच्छीमारीसाठी पाठवले गेल्याची उदाहरणे रत्नागिरी जिल्ह्यात आढळून आली आहेत. www.konkantoday.com