
कुर्ल्यात झालेल्या भयानक अपघातात फक्त माणसंच नाही तर माणुसकीचाही क्रूर अंत.
मुंबईतील कुर्ला इथं झालेल्या बेस्ट बसच्या अपघातात आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार 7 जणांचा मृत्यू ओढावला. अतिशय भीषण अशा या अपघातात काही कळायच्या आतच परिस्थिती इतकी बिघडली, की निष्पापांवर काळानं घाला घातला.याच भीषण अपघातातली भीषण दृश्य आता समोर येण्यास सुरुवात झाली असून, घटनास्थळी बसच्या चाकाखाली माणुसकीसुद्धा चिरडली आणि तिचा अंत झाला. हेच सांगणारा एक व्हिडीओ नव्यानं समोर आला आहे.
जिथं, अपघातात मरण पावलेल्या महिलेचे दागिने चोरीला जात असल्याचं स्पष्ट दिसत आहे.कुर्ल्यात झालेल्या भयानक अपघातात फक्त माणसंच नाही तर माणुसकीचाही क्रूर अंत झाला. असं म्हणण्यास कारणीभूत ठरतोय तो म्हणजे एक व्हिडीओ. कुर्ल्यात भरधाव बेस्ट बसनं अनेकांना चिरडलं. त्यात कनिस अन्सारी या महिलेचाही जागीच मृत्यू झाला.
मृत्यू झाल्यावर अज्ञात इसमाने त्यांच्या हातातील बांगड्या काढून घेतल्या. मोबाईल कॅमेरात ही चोरी कैद झाली आहेत.हा अज्ञात इसम मदतीच्या बहाण्यानं मृत महिलेच्या बांगड्या काढत होता. मोबाईलवर व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीला नंतर ही बाब लक्षात आली. बांगड्या चोरणारा व्यक्ती कोण हे मात्र अद्याप कळू शकलं नाही