
परशुराम घाट येथे गाडी अडवून मारहाण प्रकरणी ७ जणांचा शोध सुरू.
चिपळूणहून खेडकडे जाणार्या एका कारला मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट येथे अडवून त्यातील तिघांनी १० जणांना मारहाण केली होती. या प्रकरणी त्या सर्वांवर गुन्हा दाखल झाला असून त्यातील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे तर उर्वरित सातजणांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. यात कॉंग्रेस युवक जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरो याचाही समावेश आहे.५ डिसेंबर रोजी रात्री ९.४५ च्या सुमारास खेड तालुक्यातील मेटे-मोहल्ला येथे जमिन शहा यांचा मुलगा तारीक याचा वाद झाल्याने साजिदसह शाहिद सरगुरो हे दोघेजण तिथे गेले असता हा वाद पुन्हा वाढला.
हा वाद मिटावा यातून सलोखा निर्माण व्हावा यासाठी मुनावर बोट यांच्यासह उस्मान झगडे व महमद अली ह ६ रोजी चिपळूण येथे प्रयत्न करण्यासाठी आले असता हा वाद मिटला नाही.ते पुन्हा कारने खेडच्या दिशेने जात असताना मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात त्यांची कार अडवून साजित याने लोखंडी रॉडने मुनावर बोट याच्यावर जीवघेणा हल्ला केला.www.konkantoday.com