महाविकास आघाडीचे पुण्यातील उमेदवार ईव्हीएम विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार.
महाविकास आघाडीचे पुण्यातील 11 उमेदवार उद्या ईव्हीएम विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार आहेत. सर्व उमेदवार त्यासाठी आजच ही मंडळी दिल्लीला रवाना झाले आहेत. विधानसभेतील दारूण पराभवानंतर विरोधकांनी त्यातही विशेषकरून पवारांच्या राष्ट्रवादीने ईव्हीएम विरोधात आता कायदेशीर लढण्याची तयारी केली आहे.पवार गटाने मारकडवाडीत ईव्हीएम विरोधातला रस्त्यावरचा लढा यापूर्वीच सुरू केलाय.
पण सत्ताधाऱ्यांनी पडळकर, खोत या जोडगोळीला तिकडे धाडून जशासतसे प्रत्युत्तर देण्याची तयारी केल्याने विरोधकांनी आता ईव्हीएम विरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याचीही तयारी चालवलीय. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या आठवड्यात पुण्यात मविआच्या पराभूत उमेदवारांची बैठकही झाली. अॅड. असीम सरोदेही त्याला हजर होते. दरम्यान, ईव्हीएम विरोधातील अनेक याचिका सुप्रीम कोर्टाने यापूर्वीच फेटाळून लावल्यात त्यामुळे उद्या पवारांची राष्ट्रवादी नेमके कोणते पुरावे सादर करते हेच पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे..