
जयगड सरपंचांवरील अविश्वास ठराव फेटाळला
रत्नागिरी तालुक्यातील जयगड ग्रामपंचायत सरपंच फरजाना डांगे यांच्याविरोधात आणलेला अविश्वास ठराव अखेर फेटाळला गेला. अविश्वास ठरावावर स्वाक्षरी करणारे दोन सदस्यच यावेळी अनुपस्थित राहिल्याने, अविश्वास ठराव आणणार्यांना चपराक बसली आहे. या विषयात पालकमंंत्री ना. उदय सामंत, बाबू पाटील यांनी किंगमेकरची भूमिका बजावत सदस्यांचे मतपरिवर्तन करण्यात यश मिळवल्याने सौ. डांगे यांचा मार्ग सुकर झाला.
जयगड ग्रामपंचायत ही तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक समजली जाते. शिंदाल कंपनीसह अनेक व्यवसाय, जेटी या ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहेत. या ग्रामपंचायतीवर सध्या पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या शिवसेना शिंदे गटाच्या सौ. फरजाना डांगे या सरपंच म्हणून कार्यरत आहेत. त्या कुणाला विचारात न घेत नाहीत, असा आरोप करीत त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यासाठी तहसिलदारांकडे तक्रार करण्यात आली होती. www.konkantoday.com