रत्नागिरी शहरातील प्रमुख पुतळ्यांची रेडिओग्राफी पूर्ण
रत्नागिरी शहरातील प्रमुख पुतळ्यांची रेडिओग्राफी पूर्ण झाली आहे. उर्वरित पुतळ्यांची रेडिओग्राफी गुरुवारी मध्यरात्री १ ते शुक्रवारी पहाटे ४ वाजेपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर कोल्हापुरातील प्रयोगशाळेतून या रेडिओग्राफीचा अहवाल आल्यानंतर आवश्यक ती उपाययोजना केली जाणार असल्याचे रत्नागिरी नगर परिषदेच्या बांधकाम विभागाचे अभियंता यतिराज जाधव यांनी सांगितले.
रत्नागिरी शहरात अनेक पुतळे असून, खबरदारीचा उपाय म्हणून सर्व पुतळ्यांची रेडिओग्राफी करण्याचा निर्णय रत्नागिरी नगर परिषदेने घेतला.रत्नागिरी शहरात अनेक पुतळे असून, खबरदारीचा उपाय म्हणून सर्व पुतळ्यांची रेडिओग्राफी करण्याचा निर्णय रत्नागिरी नगर परिषदेने घेतला. त्यानुसार दि. २ डिसेंबरपासून ही कार्यवाही सुरू झाली. रेडिओग्राफीमध्ये पुतळ्यांची झीज, क्रॅक आणि इतर मिळते. रत्नागिरी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, स्वा. वि. दा. सावरकर, विठ्ठल मूर्ती आणि स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या हाताच्या शिल्पाची रेडिओग्राफी पूर्ण झाली असल्याचे अभियंता यतिराज जाधव यांनी सांगितले.
प्रमुख पुतळ्यांची रेडिओग्राफी झाली असून, उर्वरीत पुतळ्यांची रेडिओग्राफी गुरुवारी मध्यरात्रीनंतर पूर्ण होणार आहे. रेडिओग्राफीच्या वेळेत त्या ठिकाणच्या परिसरातील रस्त्यांवरील वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले होते.