चिपळूण तालुक्यातील टेरव जंगलातील कोळसा भट्ट्या उद्ध्वस्त.
चिपळूण तालुक्यातील टेरव येथील जंगलात सुरू करण्यात आलेल्या कोळसा भट्ट्यांप्रकरणी ग्रामस्थ आक्रमक झाल्यानंतर येथील वनविभागाने कारवाई करत कोळसा भट्ट्या उध्वस्त केल्या. यावेळी तेथील लाकूडसाठ्यासह तयार कोळसाही जप्त केला आहे. या प्रकरणी तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.टेरव येथील जंगलात अनेक महिने कोळसा भट्ट्या धगधगत असल्याची तक्रार येत होती. दरवर्षी पावसाळ्यानंतर या जंगलात कोळसा भट्ट्या लावल्या जातात. त्यामुळे गावातील काही जागरूक नागरिकांनी या विरोधात आवाज उठवला होता .www.konkantoday.com