कोल्हापूर येथून सिंधुदुर्ग जाणारा भारत पेट्रोलियम चा टँकर फोंडाघाटात पलटला ,भीषण आग.
कोल्हापुरातून सिंधुदुर्गाकडे जाणाऱ्या भारत पेट्रोलियम कंपनीच्या टँकरचा भीषण अपघात झालाय.भारत पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल टँकर फोंडाघाटात पलटी झालाय. दरम्यान, हा टँकर फोंडाघाटात पलटी झाल्याने घाटात भीषण आग लागलीये त्यामुळे ही आग आजूबाजूच्या रस्त्या च्या बाजूला लागल्याने हा घाट वाहतुकीसाठी बंद झाला आहे ही घटना कळतच पोलीस घटनास्थळी रवाना झाली आहे ही आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे टँकरच्या चालकाचा टँकर वरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला