स्थानिकांवर अन्याय झाल्यास भाजप रस्त्यावर उतरणार, अभिजित गुरव यांचा इशारा.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील रिक्त पदांवर डीएड., बीएड. उमेदवाराना कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. मात्र ही नियुक्ती करताना तालुका पातळीवर स्थानिक उमेदवारांचाच प्राधान्याने विचार व्हावा व त्यांना नियुक्ती मिळावी, अशी मागणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अभिजित गुरव यांनी केली आहे.
यामध्ये अनेक स्थानिक शिक्षकांना आपले रहिवासी दाखले हे १४ ऑक्टोपरपर्यंत देता आलेले नाहीत. परंतु १४ ऑक्टोबरनंतर ज्यांनी आपले रहिवासी दाखले दिले असतील तर त्यांचाही यासाठी विचार केला जावा अन्यथा शिक्षण विभागाने आडमुठे धोरण अवलंबले व स्थानिकांवर अन्याय झाला तर मात्र भाजपा रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशाराही गुरव यांनी दिला आहे.www.konkantoday.com