राजापूर तालुक्यात गवारेडा मृत अवस्थेत सापडला.
राजापूर तालुक्यातील कोंड्ये तर्फे सौंदळ पैकी खालचीवाडी येथील ग्रामस्थ माधव गजानन हर्डीकर यांच्या आंबा, काजू, नारळी, फोफळीच्या बागेत असलेल्या विहीरीत वन्यप्राणी रानगवा पडून मृत अवस्थेत आढळून आला.रानगव्याला वनविभागाच्या रेस्कु टिमने विहीरीबाहेर काढून त्याची विल्हेवाट लावल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.याबाबत माधव हर्डीकर यांनी वनपाल राजापूर यांना भ्रमणध्वनी वरून वन्यप्राणी रानगवा मृत आढळून आला असल्याचे कळविले. सदरची घटना परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांना कळवून, त्यांचे समवेत वनपाल राजापूर, वनरक्षक राजापूर व रेस्क्यू टीमसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता माधव हर्डीकर यांच्या आंबा, काजू, नारळी, फोफळीच्या बागेत असलेल्या विहीरीत वन्यप्राणी रानगाव पडून मृत अवस्थेत असल्याचे दिसले.
या रानगव्याला विहिरीत रस्सी टाकून जेसीबीच्या साहाय्याने विहिरीच्या बाहेर काढून सदर रानगव्याची शिकार किंवा विषबाधा झाली आहे काय याची खात्री पशुवैद्यकीय अधिकारी व वन अधिकारी यांनी केली. हा रानगवा हा नर जातीचा असून त्याचे वय दीड वर्ष असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले