बेपत्ता व्यक्तीबाबत निवेदन.
रत्नागिरी, दि.२9 : जयप्रकाश यशवंत पवार हे १६ नोव्हेंबर २०२४ पासून हर्चे, पवारवाडी ता. लांजा जि. रत्नागिरी येथून बेपत्ता आहेत. या बेपत्ता व्यक्तीचे वय-४५ वर्षे, उंची ५ फूट ६ इंच, रंग सावळा, चेहरा उभट, केस काळे पांढरे, चष्मा परिधान केलेला, अंगात निळ्या रंगाचे फुल हाताचा शर्ट व निळ्या रंगांची जीन्स पँट, पायात चॉकलेटी रंगाची प्लॅस्टिकची चप्पल, सोबत दोन मोबाईल व हातात पोस्टाच्या कागदपत्रांची बॅग आहे. या व्यक्तीबाबत कोणतीही माहिती मिळाली अथवा त्या कुठेही दिसल्यास पोलीस निरीक्षक, लांजा पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा.