बेकायदा मासेमारी प्रकरणी यावर्षी ९ नौकांवर कारवाई
जानेवारी २०२४ पासून आतापर्यंत मत्स्य व्यवसाय विभागाने गस्त या अन्य प्रकरणात ९ नौकांविरूद्ध कारवाई केली. एका नौकेचा परवाना एलईडी सामग्री वापरल्यामुळे रद्द केला आहे. बेकायदेशीर मच्छिमारी केल्याचे आढळलेल्या नौकांविरूद्ध कठोर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.रत्नागिरी येथील तत्कालीन सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त अभय शिंदे इनामदार यांच्या कार्यकाळात २०२४ सालामध्ये ९ प्रकरणे प्रतिवेदन म्हणून सादर करण्यात आली. या प्रकरणी नौका मालक व अंमलबजावणी अधिकारी यांच्याकडून म्हणणे मागवून घेण्यात आले. यानंतर कारवाईचा निर्णय घेण्यात आला. १० जानेवारी २०२४ रोजी अलिद लतिफ मुल्ला यांच्या आदिल अनाया नौकेविरूद्ध कारवाई करण्यात आली. एलईडी मासेमारी करत असल्याचे शाबित झाल्याने त्यांच्याविरूद्ध ५ लाख रुपयांचा दंड लागू झाला. याच दिवशी अस्लम आझाद सुवर्णदुर्गकर यांच्या सुविधा नौकेविरूद्ध याच आरोपाखाली प्रतिवेदन तयार कण्यात आले. सुनावणीनंतर याही नौकेला ५ लाखांचा दंड करण्यात आला. www.konkantoday.com