कोकण कृषि विद्यापीठाकडून भातपिकाची तीन नवीन वाणे विकसित.
लहरी हवामानाचा फटका भात शेतीला नेहमीच बसतो. त्यातच पिकावर कीड रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पिकांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे लहरी हवामानाच्या आव्हानांना तोंड, तसेच कीड रोगापासून लढा देवू शकेल अशा संकरित भात वाणांची गरज निर्माण झाली आहे. त्यानुसार डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या कर्जत येथील प्रादेशिक कृषि संशोधन केंद्रात यावर संशोधन करीत भाताची तीन नवीन वाणे विकसित केली आहेत. ही वाणे लवकरच शेतकर्यांच्या भेटीला येणार आहेत.राज्यात कोकण आणि विदर्भ या दोन विभागात प्रामुख्याने भात पिकाची लागवड केली जाते.
कोकणात प्रामुख्याने खरीप हंगामात ही लागवड होत असते. ३ लाख हेक्टरवर दर वर्षी भात पिकाची लागवड केली जाते. ज्यात रायगड जिल्ह्यातील जवळपास १ लाख हेक्टर क्षेत्राचा समावेश असतो. दरवर्षी यातून साधारणपणे हेक्टरी अडीच हजार ते पावणे तीन हजार क्विंटल उत्पादन मिळते.कोकणात बहुतांश शेतकरी अल्पभूधारक आहेत. शेतीला सिंचनाची सुविधा नाही. शेती क्षेत्र कमी असल्याने शेतीचे यांत्रिकीकरण झालले नाही. त्यामुळे शेतीला मजुरांची गरज भासते.www.konkantoday.com