जनतेचा हा कौल आम्हाला मान्य – सुप्रिया सुळे.
आता जनतेचा हा कौल आम्हाला मान्य असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. आपल्या X हँडल वर पोस्ट शेअर करत त्यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त केली.या निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू आणि भविष्यातील सक्षम महाराष्ट्र उभा करण्यासाठी प्रामाणिकपणे लढत राहू. शेतकरी, कष्टकरी,महिला, तरुण व समाजातील प्रत्येक घटकांच्या हक्काची व स्वाभिमानाची लढाई आम्ही खंबीरपणे कायम लढत राहू असे प्रतिपादन सुप्रिया सुळे यांनी केले आहे. त्याच बरोबर या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत सहभागी झालेले मतदार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे कार्यकर्ते,पदाधिकारी यांचे सुद्धा सुप्रिया सुळे यांनी आभार व्यक्त केले, त्याच सोबत विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे सुप्रिया सुळे यांनी अभिनंदन केले.