
दापोली पोलिस ठाण्याच्या आग प्रकरणी पोलिस अधीक्षकांचे चौकशीचे आदेश
दापोली : दापोली : पोलिस ठाण्याला शनिवारी पहाटे लागलेल्या आगीच्या प्रकारची चौकशी करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी यंत्रणेला दिल्या आहेत.
रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग हे दापोली विद्यापीठ येथे उपस्थित असल्याने त्यांनी तत्काळ दापोली पोलिस ठाण्याला भेट देऊन दुर्घटनेची पाहणी केली. आग कोणत्या कारणाने लागली, याची चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. पोलिस ठाण्याची इमारत खूप जुनी असून नवीन इमारत प्रस्तावित आहे. त्याला तत्काळ मंजुरी देण्यात येईल आणि लवकरच इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.