संगमेश्वर तालुक्यातील कडवई परिसरात बिबट्याची दहशत
संगमेश्वर तालुक्यातील कडवई परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी ६ वा. घोसाळकर कोंडचे रहिवासी संजय घोसाळकर याच्या काजू बागेत फेरफटका मारायला गेले असताना त्यांना नवीन होणार्या पाण्याच्या टाकीच्या ठिकाणी बिबट्या दिसला. चिखली बाजारपेठेजवळ असणार्या नदीच्या मोरीजवळ बिबट्या अनेक ग्रामस्थांनी पाहिला आहे.
कडवई मुस्लिम मोहल्ल्यातील निहाल खान यांच्या घरामागे बिबट्याचे ठसे आढळले तर कडवई कुंभारवाडीतील नीलेश कुंभार यांच्या घराजवळ असलेल्या खुराड्याची जाळी तोडून ३ कोंबड्या बिबट्याने फस्त केल्या. कडवई किंजळवाडीतील तरूण घराकडे परतताना त्यांना बिबट्याचे दर्शन झाले.
देवरूख परिक्षेत्राचे वनाधिकारी तौफिक मुल्ला यांच्याशी संपर्क साधला असता बिबट्या दिसला, त्या त्या ठिकाणी भेट देवून उपाययोजना केली जाणार असल्याचे सांगितले. www.konkantoday.com