
चिपळूण-पेढांबे येथे शॉक लागून तरूणाचा मृत्यू
चिपळूण तालुक्यातील पेढांबे येथे विजेच्या धक्क्याने एका ३३ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. याप्रकरणी अलोरे-शिरगांव पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
महावीर घनीराम सोरेन (३३, झारखंड) असे मृत तरूणाचे नाव आहे. पेढांबे स्वीचयार्ड येथे एम.एस.ई.बी.च्या टॉवरवर सेफ्टी बेल्ट लावून महावीर सोरेन हा काम करत होता. यावेळी त्याला विजेचा धक्का बसल्याने यातच त्याचा मृत्यू झाला.
www.konkantoday.com