
डंपरची पेट्रोलपंपाच्या खांबाला धडक
रत्नागिरी मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे डंपरची पेट्रोलपंपाच्या छताला लागून असलेल्या खांबाला धडक बसली. ही घटना रविवारी घडली. या प्रकरणी पेट्रोलपंपाचे कर्मचारी सुरज शांताराम म्हादे (२३, रा. निवळी, रावणंगवाडी) ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. निरजकुमार जयराम महतो (रा. झारखंड) असे या डंपरचालकाचे नाव असून त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
www.konkantoday.com