आमच्या विजयात उद्धव ठाकरे यांचा खारीचा वाटा- नितेश राणे.
उद्धव ठाकरेंच्या सभांचं निवडणुकीवर काय परिणाम होईल, या प्रश्नावर बोलताना नितेश राणे म्हणाले, “23 तारखेला आमचे तिन्ही उमेदवार निवडून येणार. त्यात उद्धव ठाकरेंचा सिंहाचा नाही, खारीचा वाटा असेल. जेव्हा-जेव्हा उद्धव ठाकरे सिंधुदुर्गात प्रचारासाठी आले, आधी लोकसभेला आले, जिथे सभा झाली, तिथून मला शिव्या-शाप दिल्या. माझं मतदान 29 वरुन 42 हजारवर गेलं. आमच्यासाठी त्यांचा पायगुणच इतका चांगला आहे की, ते आले आमच्या तिन्ही सीट कन्फर्म झाल्या. आता फक्त गुलाल उडवायचा बाकी आहे. उद्धव ठाकरे उबाठाच्या उमेदवारांसाठी पनवती आहे, पण आमच्यासाठी ते चांगले आहेत.” असं राणे म्हणाले.