अखेर कुणाला पाडायचं मनोज जरांगेंनी केलं स्पष्ट!

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजाला एकजूट करून समाजाची मोट बांधणारे मनोज जरांगेंनी कुणाला पाडायचं हे अखेर स्पष्ट केलंय. एवढंच नाही तर यावेळी जरांगेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष करत विश्वासघाताचा आरोप केला आहे. लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा महायुतीला जोरदार फटका बसला. त्यानंतर विधानसभेसाठी मनोज जरांगेंनी निवडणूक लढवण्याची रणनीती आखली होती. त्यासाठी जरांगेंनी बैठका घेत मराठा मुस्लीम, दलित समीकरण जुळवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर जरांगेंनी निवडणूक न लढवता पाडापाडी करणार असल्याचं स्पष्ट केलं. आता मराठा समाजाने संभ्रमात राहू नका, असं आवाहन जरांगेंनी केलंय. याबरोबरच जरांगेंनी थेट फडणवीसांवर निशाणा साधत मराठा समाजाला सूचक संकेत दिलाय. इतकंच नाही नाही तर जरांगे विधानसभेसाठी विशेष रणनीती आखली आहे.

दरम्यान मनोज जरांगे हे आरक्षणाची लढाई तीव्र करण्याची तयारी सुरु केली असून 10 दिवसात 17 जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत प्रत्येक गावात सभांचं आयोजन करणार असून दौऱ्यात आरक्षणाच्या आंदोलनाची तयारी करणारलोकसभा निवडणुकीत सुफडा साफ झाला. त्यामुळे सावध झालेल्या भाजपने मराठवाड्यात मराठा फॅक्टरवर लक्ष केंद्रीत केल्याचं दिसून येतं मात्र जरांगेंनी कुणाला पाडायचं हे मराठा समाजावर सोडून दिलं आहे. त्यामुळे विधानसभेला पुन्हा एकदा जरांगे फॅक्टर चालणार की भाजप नवा डाव टाकणार? याकडे लक्ष लागलंय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button