वाशिष्ठी नदी कोरडी पडू लागल्याने गोवळकोट जॅकवेल रूतली गाळात.
पावसाळा संपल्याने वाशिष्ठी नदी कोरडी पडू लागली आहे. त्यातच गोवळकोट येथील जॅकवेल गाळात रूतल्याने अर्ध्या शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे नगर पालिका प्रशासनाने मंगळवारी वाशिष्ठी नदीत पाट काढून पाण्याचा प्रवाह गोवळकोट जॅकवेलकडे वळवला आहे. त्यामुळे आता हे पाट नागरिकांची तहान भागवणार आहेत.चिपळूण नगर पालिकेच्या गोवळकोट जॅकवेलमधून गोवळकोट, गोवळकोट रोड, पेठमाप, बाजारपेठ, उक्ताड या भागांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र ज्या भागात जॅकवेल आहे त्या भागात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. www.konkantoday.com