रत्नदुर्ग किल्ला परिसरात मंकाळा प्राचीन पटखेळाचे अवशेष.
रत्नदुर्ग किल्ला रत्नागिरी येथे आफिक्रेमधील पारंपारिक पटखेळातील प्रकार मंकाळा खेळाचे कातळचिन्ह आढळून आले आहे. ज्यावेळी गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्यावतीने नुकतीच रत्नदुर्ग किल्ल्याची साफसफाई करण्यात आली. त्यावेळी दीपगृह परिसरात हे शिल्प या प्रतिष्ठानमध्ये कार्यरत असणार्या संशोधन अभ्यासक स्नेहल बने यांच्या ही बाब उघडकीस आली. हे पटखेळाचे चिन्ह सुमारे १४०० वर्षापूर्वीचे असून प्रथमच असे रत्नदुर्ग किल्ल्यात दिसून आले आहे, असा दावा बने यांनी केला आहे.मंकाळा हा आफ्रिकन लोकांमध्ये खेळला जाणारा पटखेळ आहे. कातळावर गोल आकाराचे खड्डे एका रांगेत हव्या असलेल्या पटांची संख्येमध्ये कोरून दोन सवंगड्यांमध्ये हा खेळ खेळला जातो. भारतात अनेक ठिकाणी याला गायचारा, पलंगुळी, अलगुळी आदी नावाने ओळखले जाते. तसेच खेळ सापडलेल्या ठिकाणी शिवपिंडी सारख्या आकाराचे देखील दाने शिल्प असल्याचे दिसून येत आहे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या कार्यामध्ये रत्नदुर्ग किल्ल्याचे बालेदार तन्मय जाधव व सक्षम शिंदे यांची देखील मोलाची मदत झाली, असे स्नेहल बने यांनी सांगितले.रत्नदुर्ग किल्ला परिसरातील आढळून आलेले मंकाळा पटखेळ १ फूट ९ इंच लांब असून त्यावर १२ पट आहेत. तर शिवपिंडी १ फूट लांब व ८ इंच रूंद आहेत. तसेच या ठिकाणी एक पूर्ण वतुंळ असून दुसर्या वर्तुळाच्या मध्यभागी रेषा असलेली तीन चिन्ह एकाच कातळावर कोरलेली दिसतात. मंकाळा पटखेळाची चिन्हे आढळून आल्याने यातून त्या काळी आफ्रिकन प्रजातीचे लोक भारतात व्यापार व प्रवासी मार्गाने आली होते, याबाबत अधिक संशोधन करणे गरजेचे असल्याचेही स्नेहल बने यांनी सांगितले. www.konkantoday.com