शिवसेनेने वर्सोव्यात हारून खान यांना उमेदवारी दिली.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडून अल्पसंख्यांक उमेदवार देण्याबाबतचा विचार करण्याचे आवाहन मुस्लीम समाजाच्या वतीने करण्यात आले होते.वर्सोव्यात सुमारे १ लाख १० हजार अल्पसंख्यांक मतदार आहे. तसेच भाजपच्या व एमआयएमच्या रणनीतीला उत्तर देण्यासाठी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी वर्सोवा विधानसभेतील उद्धव सेनेचे प्रभाग क्रमांक ६३ व ६४ चे उपविभागप्रमुख हारून खान यांना उमेदवारी दिली आहे.गेली ३० वर्षे गटप्रमुख, शाखाप्रमुख, उपविभागप्रमुख अश्या चढत्या क्रमाने पक्षाचे काम निष्ठेने करणारे व पक्षफुटीनंतर उध्दव ठाकरे यांच्या मागे ते ठामपणे उभे राहिले.जन्माने अल्पसंख्यांक असूनसुद्धा गणपतीची आरती व संस्कृत भाषेतील श्र्लोक ते स्पष्ट शब्दात म्हणतात.त्यांना उमेदवारी मिळाल्यामुळे विधानसभा क्षेत्रात संमिश्र प्रतिक्रिया ऐकायला मिळतात. स्थानिक पदाधिका-यांमध्ये दोन गट पडले तरी उद्धव सेनेत हारून खान यांना उमेदवारी मिळाली म्हणून आनंदाचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button