सहकार न्यायालयासाठी उच्च न्यायालय सकारात्मक, ऍड. विलास पाटणे.
रत्नागिरी सहकार न्यायालयासाठी इमारतीत जागा उपलब्ध करून देण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने सकारात्मकता दर्शविली आहे. यास्तव रत्नागिरी जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. विलास पाटणे यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांना भेटून न्यायालयाच्या नवीन इमारतीमध्ये जागा उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केली आहे.यावेळी न्यायमूर्ती डिगे यांनी या प्रश्नाबाबत सकारात्मक चर्चा केली. सोबत ऍडव्होकेट असोसिएशन ऑफ वेस्टर्न बारचे कोषाध्यक्ष ऍड. राकेश भाटकर होते. ऍड. पाटणे यांनी जिल्ह्याचे पालक न्यायाधीश न्या. माधव जामदार यांनी या प्रश्नात लक्ष घालू असे आश्वासन दिले.www.konkantoday.com