राजापूर मतदारसंघातून किरण सामंत २४ ऑक्टोबरला अर्ज दाखल करणार.
मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील सिंधुरत्न योजनेचे अशासकीय सदस्य श्री. किरण उर्फ भैया सामंत दि. २४ ऑक्टोबरला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.गेले महिनाभर किरण सामंत यांनी लांजा तालुक्यात विशेष जनसंपर्क मोहीम राबवून बहुतांशी पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांना शिवसेनेत दाखल करून घेतले आहे. साखरपा-लांजा-राजापूर विधानसभा मतदार संघातून शिवसेनेमार्फत निवडणूक लढविण्यासाठी किरण सामंत इच्छूक आहेत. उमेदवारी मिळण्यासंदर्भात कोणताही निर्णय झाला तरीही अपक्ष म्हणून विधानसभेच्या रिंगणात उभे राहण्याचा निर्णय किरण सामंत यांनी घेतला आहे. www.konkantoday.com