दुर्गेश आखाडे यांची ‘दुरावा’ द्वितीयमोडीदर्पण कथालेखन स्पर्धेचा निकाल जाहिर.
रत्नागिरी दि.१४ प्रतिनिधी मोडीदर्पण या दिवाळी अंकाच्या वतीने आयोजित कथालेखन स्पर्धेचा निकाल जाहिर झाला आहे.या स्पर्धेत जयवंत माजळकर यांच्या ‘वाटणी’ या कथेने प्रथम क्रमांक तर दुर्गेश आखाडे यांच्या ‘दुरावा’ या कथेने द्वितीय क्रमांक पटकावला आहे.स्पर्धेत तृतीय क्रमांक विभागून पुष्पा कोल्हे यांच्या ‘ दोन मुलांची आई’ आणि प्रा.वर्षा फाटक यांच्या सुटका या कथेला मिळाला आहे.उत्तेजनार्थ पारितोषिक सचिन काळे यांच्या ‘आला रे’, राजेश गोसावी यांच्या ‘धोंडीराम आक्का’ आणि अमोल रेडीज यांच्या ‘वाघ्या’ या कथेला मिळाला.ज्येष्ठ साहित्यिक आणि अभिनेते नारायण जाधव यांच्या नेतृत्वातील परिक्षक मंडळाने हा स्पर्धेचा निकाल जाहिर केला.सर्व विजेत्या कथालेखकांचे सुभाष लाड यांनी अभिनंदन केले आहे.