86 टक्के मिळवून दहावीला चमकली, इंजीनियरिंग होण्याचे स्वप्न अधुरे. वैष्णवी माने या विद्यार्थिनीची एक्झिट चटका लावणारी
रत्नागिरी कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यात दांडिया खेळता खेळता एका विद्यार्थिनीला खेळताना चक्कर आली. वैष्णवी प्रकाश माने वय १६ या विद्यार्थिनीचा नवरात्रोत्सवातच दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. सरस्वती पूजनावेळी सुरू असलेल्या दांडिया कार्यक्रमात हा दुर्दैवी प्रसंग घडला यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. शाळा व्यवस्थापन तसेच शिक्षकांनाही या घटनेमुळे मोठा धक्का बसला असून हुशार व लाडक्या विद्यार्थिनीची एक्झिट चटका लावणारी ठरली आहे. वैष्णवी ही विद्यार्थिनी अभ्यासात अत्यंत हुशार होती. इयत्ता दहावीत आजीवली हायस्कूल मध्ये तिने ८६ टक्के गुण मिळवून हायस्कूलच्या गुणवत्ता यादी तिचं नाव चमकलं होतं. इतकच नाही तर तिला इंजिनिअरिंग करायचं होतं हे तिच स्वप्न होतं मात्र निष्ठूर नियतीच्या खेळामुळे अधुरं राहिला आहे. प्रशासन अनेक योजना या जनहितासाठी राबवत असतानाच आरोग्य व शिक्षण या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी वैष्णवी सारख्या अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना काही किलोमीटरची पायपीट करून दररोज आपल्या शाळेत यावं लागतं हेही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील धक्कादायक वास्तव या दुर्दैवी घटनेमुळे समोर आल आहे.दहावी मध्ये उत्तम मार्क मिळाल्यानंतर तिला इंजिनिअरिंग करायचं होतं यासाठी तिला एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन हे मिळालं होतं मात्र आई-वडिलांची आठवण येत असल्याने तिने ऍडमिशन मिळालेल हायस्कूल सोडून पुन्हा पाचल येथील सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला. हायस्कूल प्रमाणे याही महाविद्यालयातही वैष्णवी ने अभ्यासातील गुणवत्ता, उत्तम वक्तृत्व शैली, खेळातील आवड यामुळे शाळेतील गुरुजनांची मन जिंकली होती. अलीकडेच पंधरा दिवसांपूर्वी तिने राजापूर ओणी हायकूल मध्ये वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला होता या स्पर्धेत तिचा प्रथम क्रमांक आला होता अशीही मोठी आठवण वैष्णवीच्या निकटवर्तीयांनी सांगितली. पाचल येथील सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयतील सायन्स मधून इयत्ता अकरावी मध्ये शिक्षण घेत होती. अभ्यासाबरोबरच अनेक खेळांमध्ये तिला खेळण्याची मोठी आवड होती ही आठवण सांगताना गुरुजनांचेही डोळे पाणावले. शाळेसाठी दररोज पायपीटवैष्णवी हिला दांडिया खेळताना चक्कर आली खाली बसली यातच तिचा मृत्यू झाला या दुःखद घटनेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आजही काही किलोमीटरची करावी लागणारी पायपीट हे चित्र समोर आला आहे . राजापूर पाचल येथील महाविद्यालय शिकणारी वैष्णवी ही आजीवली या आपल्या गावातून धनगर वाडीतून तब्बल दोन किलोमीटर पायपीट करून एसटी स्टॉप पर्यंत रोज येत होती. नंतर त्यापुढे दररोज एक तास एसटीने ने प्रवास करून पाचल मध्ये हायस्कुल मध्ये जात होती. वैष्णवी हीच्यासारख्या अनेक मुलांना आजही ग्रामीण भागात काही किलोमीटरची पायपीट करून शिक्षण घेण्याकरता यावं लागतं हे वास्तव आहे. मात्र सगळ्याच मुलांना हा त्रास शिक्षणासाठी करावी लागणारी पायपीट सहन होते असं नाही. वैष्णवी हिला अचानक चक्कर कशामुळे आली हे समजू शकले नसलं तरीही शालेय विद्यार्थ्यांची पायपीट वाचवण्यासाठी स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधी यांना काही उपाययोजना करता आल्या तर विद्यार्थ्यांना होणारा हा ही त्रास वाचू शकेल. यासाठी ही प्रयत्न व्हायला हवेत असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही. वैष्णवीचे वडील सिंधुदुर्ग ग्रामीण बँकेत व्यवस्थापक या मोठ्या पदावर आहेत तर आई गृहिणी आहे तिच्या पश्चात एक बहिण भाऊ अशी दोन लहान भावंड, काका काकी असा मोठा परिवार आहे. या सगळ्या घटनेची नोंद राजापूर पाचल पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.