निलेश राणे जर का शिवसेनेत आले तर, त्यांचे स्वागतच असेल-मंत्री दीपक केसरकर.

आता माजी केंद्रीयमंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काही दिवसांपूर्वी वर्षा निवासस्थानी भेट घेतली. महायुतीत विधानसभेसाठी जागावाटपावर चर्चा सुरू आहे. दरम्यान या सगळ्या चर्चा सुरू असताना माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार यांचे सुपुत्र माजी खासदार निलेश राणे हे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. ते विधानसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत. आता यावर मंत्री दीपक केसरकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.निलेश राणे जर का शिवसेनेत आले तर, त्यांचे स्वागतच असेल. युतीमध्ये उमेदवार बदलून देण्याची प्रथा आहे. एकमेकांचे उमेदवार बदलले जाती, इतकी आमची युती घट्ट आहे,” असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले आहेत. निलेश राणे हे विधानसभा निवडणूक लढ वण्यास उत्सुक आहेत. मात्र ते कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button