मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जिल्हास्तरीय मेळावा आठवडा बाजार ते काँगेस भुवन नाका सोमवारी वाहतुकीस प्रतिबंध

रत्नागिरी, : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत जिल्हास्तरीय मेळावा कै. प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे उद्या 7 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला असल्याने सर्व प्रकारच्या वाहनांना 7 ऑक्टोबर रोजी आठवडा बाजार नाका ते काँगेस भुवन नाका दरम्यान वाहतुकीस प्रतिबंध करण्याबाबतचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिले आहेत. 7 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत जिल्हास्तरीय मेळाव्याचे कै. प्रमोद महाजन क्रीडा संकुल, आठवडा बाजार येथे आयोजित करण्यात आले आहे. या मेळाव्याकरिता जिल्ह्यातील अंदाजे 5 हजार महिला उपस्थित राहणार असल्याचे कळविण्यात आले आहे. अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 115 व 116 नुसार प्राप्त अधिकारान्वये वाहतूक कोंडी टाळण्याकरिता व कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता आठवडा बाजार नाका ते काँगेस भुवन नाका दरम्याने सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत असल्याबाबतचे आदेश जारी केले आहेत. तसेच पर्यायी मार्ग म्हणून काँगेस भुवन-मुरलीधर मंदिर-भुते नाका मार्गे आठवडा बाजार या पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात यावी. वाहतुकीची कोंडी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता योग्य नियोजन करण्यात यावे, असेही आदेशात म्हटले आहे. वाहतूक नियमनाबाबत जनतेस माहिती मिळावी यादृष्टीने मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 116 प्रमाणे वाहतुकीची चिन्हे उभारण्याची कार्यवाही पोलीस विभागाने करावयाची आहे.000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button