विधानसभेत प्रश्न विचारण्यात काँग्रेसचा ‘हा’ आमदार अव्वल, आदित्य ठाकरेंचा नंबर कितवा? विधानसभा निवडणुकांची घोषणा कधीही होण्याची शक्यता आहे. अशा वेळी मागील म्हणजेच 14 वी विधानसभा नोव्हेंबर महिन्यात विसर्जित होणार आहे. त्यामुळे मागील पाच वर्षात कोणत्या आमदाराची कामगिरीही दमदार होती? याचा एक अहवाल संपर्क या संस्थेने तयार केला आहे. त्यात कोणत्या आमदाराने सर्वात जास्त प्रश्न सरकारला विचार? सर्वात कमी प्रश्न कोणी विचारले? कुणी काहीच प्रश्न विचारले नाहीत याचा आढावा घेतला आहे.

मागील पंचवार्षिक काळात विधिमंडळाची एकूण 12 अधिवेशनं पार पडली. गेल्या विधानसभेच्या तुलनेत कोविडचा परिणाम म्हणून आरोग्यविषयक प्रश्नांत वाढ झाली आहे. यासह महिलांविषयक प्रश्नांत दुपटीने वाढ झाली. तर बालकांवरील प्रश्नांत निम्म्याहून अधिक घट झाली आहे. अल्पसंख्य समाजाविषयी मात्र केवळ नऊ प्रश्न गेल्या पाच वर्षात विचारण्यात आले आहेत. सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्यांच्या यादीत काँग्रेस आमदार अव्वल स्थानी आहे.विधीमंडळाच्या या झालेल्या अधिवेशनामध्ये राज्यातील आमदारांनी 5,921 इतके प्रश्न सभागृहात मांडले. यात मुंबादेवीचे काँग्रेस आमदार अमीन पटेल यांनी सर्वाधिक 656 प्रश्न मांडले. प्रश्न विचारणाऱ्या आमदारांत त्यांनी अव्वल स्थान पटकावले आहे. तर महिला आमदारांमध्ये सर्वाधिक प्रश्न हे भाजप आमदार मनिषा चौधरी यांनी विचारले आहेत. त्यांनी 459 प्रश्न विचारले. या विधानसभेत जवळपास 92 जण हे पहिल्यांदा आमदार झाले होते. त्यांच्यात काँग्रेसच्या वरोऱ्याच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी सर्वाधिक 316 प्रश्न विचारले आहेत. भाजपचे आशिष शेलार, काँग्रेसचे अस्लम शेख, कुणाल पाटील आणि कम्युनिस्ट पक्षाचे विनोद नोकोले हे प्रश्न विचारणाऱ्या पहिल्या पाच आमदारांत आहेत.सुरूवातीला महाविकास आघाडीचे सरकार होते. अडीच वर्षानंतर हे सरकार कोसळले. मविआ सरकारला दोन वर्षाहून अधिक काळ कोविडशी सामना करावा लागला. त्यानंतर सत्तांतर झालं. त्यामुळे एकूणच प्रश्नाचं प्रमाण कमी असलं तरी मानवनिर्देशांकाशी संबंधित असलेले प्रश्न अत्यंत कमी आहेत असे या अहवालात दिसून येते. आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांमध्ये बहुसंख्य प्रश्न हे घोटाळा, वाळू उपसा अशा संदर्भातले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी ज्या शास्त्रांचा वापर करायला हवा ते फारच कमी प्रमाणात वापरल्याचेही दिसून येत आहे.दरम्यान यात शिवसेनेचे युवा नेते आणि वरळी मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मंत्रीपद सोडल्यानंतरच्या अडीच वर्षांमध्ये किती प्रश्न विचारले याचाही आढावा या अहवालात घेण्यात आला आहे. संपर्कच्या अहवाला नुसार आदित्य ठाकरे यांनी विरोधी पक्षात असताना केवळ एक प्रश्न विचारला असल्याचे म्हटले आहे. तर सांगलीचे आमदार सुधीर गाडगे यांनी तर एकही प्रश्न विचारलेला नाही.शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यांनीही एकही प्रश्न विचारलेला नाही.नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा मतदारसंघाचे प्रतिनिधी आमदार के. सी. पाडवी यांनी एकही प्रश्न विचारलेला नाही. वाशिमचे भाजपचे आमदार लखन मलिक यांनी एकही प्रश्न विचारलेला नाही. शिवाय बाळापूरचे शिवसेनेच्या आमदाराने एक प्रश्न विचारला आहे. मिरजचे आमदार सुरेश खाडे आणि बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनीही एकच प्रश्न विचारला आहे. दरम्यान अहवालातल्या आकडेवारीची सत्यता जाणून घेताना संपर्कच्या अधिकारी जोग यांनी ही आकडेवारी विधीमंडळाच्या संकतस्थळावरून घेतले असल्याचे स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button