जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धेत नेमबाजीमध्ये पुष्कराज स्पोर्ट्स शूटिंग अकॅडमीचे घवघवीत यश सहभागी २१ खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड
रत्नागिरी | प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म. रा. पुणे यांच्या विद्यमाने जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या वतीने चिपळूण येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धेत पुष्कराज स्पोर्ट्स शूटिंग अकॅडमी मधील विविध शाळातील 21 विद्यार्थ्यांनी नेमबाजीमध्ये विविध पदके प्राप्त केली. जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या वतीने सन 2024- 25 या शैक्षणिक वर्षात जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धा कार्यक्रम २० सप्टेंबर रोजी एस.व्ही. जे. सी. टी. क्रीडा संकुल डेरवण, चिपळूण येथे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये भारतीय प्रख्यात नेमबाज व भारतीय क्रीडा प्राधिकरण मान्यता प्राप्त ग्रेड ए शूटिंग कोच सौ. राजेश्वरी पुष्कराज इंगवले यांच्या पुष्कराज स्पोर्ट्स शूटिंग अकॅडमी मध्ये मार्गदर्शन घेतलेल्या जिल्ह्यातील विविध शाळातील 26 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यातील तब्बल 21 विद्यार्थ्यांची विविध पथके पदके प्राप्त केल्यामुळे कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेत निवड झाली आहे. त्यामध्ये सोहम जीवन जाधव, सिद्धांत सूर्यगंध, करण संतोष बेहरे, शुभम सागर पुसाळकर, राधिका राजन सुर्वे, आर्यन वैभव बनप, ओम महेंद्र जाधव, तनया समीर शिवलकर, जिया चंदन चव्हाण, देवर्षी शैलेश कासार, दुर्गा संतोष जाधव आणि सानवी वैभव देसाई यांना सुवर्णपदक प्राप्त झाली आहेत. तर दिग्विजय आनंद चौगुले, ऋग्वेद सिद्धार्थ बेंडके, पार्थ दीपक साळवी, प्रथमेश रणजित गद्रे, किमया प्रशांत जाधव, जुनेरा अश्फाक काझी या खेळाडूंना रौप्य पदके प्राप्त झाली आहेत. तर निदिश निनाद कदम, अनाम मेहमूद शेमले आणि साद अशफाक काझी यांना कांस्य पदके मिळाली आहेत. या खेळाडूंनी ओपन साईट रायफल, पिस्तूल, पीप साईड रायफल अशा विविध प्रकारच्या नेमबाजी या क्रीडा प्रकारात भाग घेऊन ही पदके प्राप्त केली आहेत. याबद्दल त्यांचे कोच प्रख्यात नेमबाज पुष्कराज इंगवले आणि पुष्कराज स्पोर्ट्स शूटिंग अकॅडमी च्या संचालकांचे कौतुक होत आहे.