रत्नागिरी शहराजवळील टीआरपी येथील डी मार्टसमोर दोन त तरुणांना रॉडने मारहाण.
रत्नागिरी शहराजवळील टीआरपी येथील डी मार्टसमोर दोन तरुणांना तरुणांना १० जणांनी रॉडने मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार गुरूवारी (ता. २६) दुपारी घडला.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी भूषण बिपिन सावंत (वय २४, रा. मिऱ्याबंदर, रत्नागिरी) यांचा मावस भाऊ धर्मलिंग नाडर यांच्यात झालेल्या भांडणाबाबत भूषण व त्याचे मित्र सर्वेश कीर, असे दुचाकीने ग्रामीण पोलिस ठाण्यात जात होते हे सर्व संशयितांना समजले. दोघांनी दुपारी भूषण याला डी-मार्ट येथे थांबण्यास सांगितले. भूषण हा त्याच्या मित्रासोबत थांबला. त्या दोघांनी तू मध्ये पडू नकोस. आम्ही आज त्याला मारणार आहेत, असे सांगितले. त्यानंतर सात ते आठजण मोटारसायकलने तिथे आले व जमाव करून जमावाने आले. त्यांच्यात वाद झाला. त्या वेळी संशयितांनी भूषणला फाईट मारली आणि रॉडने मारहाण केली. तसेच त्याचा मित्र सर्वेश याला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दुखापत केली. या झटापटीत फिर्यादीच्या गळ्यातील चेन व हातातील ब्रेसलेट कोठेतरी गहाळ झाले. तसेच या मारहाणीत फिर्यादी भूषण सावंत व त्याचा मित्र सर्वेश कीर जखमी झाले. या प्रकरणी फिर्यादी भूषण सावंत यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी दहा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.