कोकण मार्गावरअहमदाबाद-मंगळूरची उद्या अखेरची फेरी.

कोकण मार्गावर गणेशोत्सवासाठी अहमदाबाद-मंगळूर स्पेशलच्या सहा फेर्‍या चालवण्यात आल्या. वसईमार्गे चालवण्यात आलेल्या स्पेशलमुळे बोरिवली, वसई, विरारस्थित चाकरमान्यांची मोठी गैरसोय दूर झाली. या स्पेशलची २० सप्टेंबर रोजी अखेरची फेरी आहे.अहमदाबाद-मंगळूर स्पेशल २० सप्टेंबर रोजी सायं. ४ वा. अहमदाबाद येथून सुटून दुसर्‍या दिवशी सायं. ७.४५ वा. मंगळूर येथे पोहचेल. परतीच्या प्रवासात २१ सप्टेंबर रोजी रात्री १०.१० वा. मंगळूर येथून सुटून दुसर्‍या दिवशी अहमदाबाद येथे पोहचेल. स्पेशलला कोकण मार्गावर पनवेल, रोहा, माणगांव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्‍वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, नांदगांव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिवीम, करमाळी, मडगाव आदी स्थानकात थांबे आहेत. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button