
मच्छिबंदीच्या कालावधीमध्ये ३०० हून अधिक लॉंचीस किनार्यावर
रत्नागिरी ः रत्नागिरी हरालगतचे मिरकरवाडा बंदरातील कोट्यावधींची उलाढाल आजपासून थंडावली असून पुन्हा ती १ ऑगस्टपासून सुरू होणार असल्याने आता सुमारे ३०० पेक्षा अधिक लॉंची उभ्या राहणार आहेत.
या मच्छिमारी लॉंची बंद झाल्यामुळे शेकडो खलाशी आपापल्या गावी गेले आहेत. तर फक्त जाळी विणणार्यांना काम मिळणार आहे. कारण एका लॉंचीवरती २५ ते ३० जाळी विणणारे कामगार असतात. आता या दोन महिन्यात त्यांना काम असेल त्याना दररोज ४०० रुपये इतका मोबदला दिला जातो.
कारण पर्ससीननेट लॉंचवरील जाळ्यांच्या किंमती ३० ते ३५ लाखांचे घरात असतात आणि प्रत्येक माशाचे प्रमाणे जाळी असतात