लालबाग मध्ये खटाव बिल्डिंग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकी दरम्यान आयोजक व पोलिसांच्यात मोठा वाद

. लालबागमध्ये गुरुवारी रात्री विसर्जन मिरवणुकी दरम्यान मोठा राडा झाला. काल गौरी-गणपती विसर्जन होतं. यावेळी खटाव बिल्डिंग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकी दरम्यान मोठा वाद झाला.डीजे सिस्टिम बंद करण्यावरुन या सर्व वादाला सुरुवात झाली. एका पोलिसाने डीजे ऑपरेट करणाऱ्या तरुणाला मारहाण केली. त्याचं सामान उचलून घेऊन गेले. त्यावरुन लालबागमधील खटाव बिल्डिंगचे रहिवाशी, नागरिक रस्त्यावर आंदोलनाला बसले. विसर्जन मिरवणूक पुढे नेणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली. वाद वाढल्यानंतर स्थानिक आमदार अजय चौधरी, खासदार अरविंद सावंत तिथे पोहोचले. त्यांनी मध्यममार्ग काढण्याचा प्रयत्न केला.“आम्ही पोलिसांना सहकार्य करत होतो. पोलिसांनी सांगितल्यानंतर आम्ही आमचा डीजे बंद केला. पण या दरम्यान दोन पोलिसवाल ट्रकमध्ये चढले. त्यांनी लाथ मारुन स्पीकर खाली पाडला. दुसऱ्या पोलिसाने डीजे ऑपरेटरला लाथा-बुक्क्यानी मारहाण केली” असं स्थानिक नागरिक अभय घाग यांनी सांगितलं. या प्रकारावरुन नागरिक प्रचंड संतापले. मारहाण करणारे पोलीस माफी मागत नाहीत तसेच घेऊन गेलेल्या वस्तू परत आणून देत नाहीत, तो पर्यंत जागेवरुन हलायच नाही अशी भूमिका घेत तिथेच ठिय्या मांडला.इतकं ताणून धरण्याची गरज नव्हती. घड्याळाच्या काट्यावर दहा मिनिटं, एक मिनटं असं बघण्याची गरज नाही. तुम्ही त्यांची जी वस्तू घेऊन गेलायत, ती परत आणून द्या. वातावरण का बिघडवताय? तुम्ही ऐकत नसाल, तर आम्ही त्यांच्यासोबत आहोत” असं स्थानिक खासदार अरविंद सावंत म्हणाले. खटाव बिल्डिंग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच हे 99 व वर्ष आहे. पुढच्यावर्षी मंडळाच शतक महोत्सवी वर्ष आहे. लालबागमधील हे लालबागचा राजा, मुंबईचा राजा यापेक्षा हे जुन मंडळ आहे. मंडळाने नेहमीच चांगले सामाजिक उपक्रम राबवले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button