चालत्या दुचाकीवर महावितरणचा वीज खांब कोसळून दोघे गंभीर.

रत्नागिरी शहरातील पर्‍याची आळी येथे महावितरणचा खांब चालत्या दुचाकीवर पडला. यामध्ये ऍक्टीव्हा चालक अजय संतोष शिंदे (वय २८) व पाठिमागे बसलेली महिला भाग्यश्री प्रकाश पावरी (वय १८, दोघे रा. जयगड) जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तत्काळ जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास झाला.रत्नागिरी शहर पोलिसाना ही घटना कळताच पथक घटनास्थळी रवाना झाले. गंजलेल्या व पडणार्‍या स्थितीत असलेल्या खांबाकडे महावितरणने वेळीच लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button