मुंबई-कुडाळ- मुंबई अनारक्षित विशेष ट्रेनची घोषणा.
जे चाकरमानी कोकणात गणेशोत्सवासाठी जाणार आहेत, त्यांच्यासाठी कोकण रेल्वेनं मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई-कुडाळ- मुंबई अनारक्षित विशेष ट्रेनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळं ज्यांना अद्याप रेल्वेच्या नियमित गाड्यांचं आरक्षण मिळालेलं नाही त्यांना या गाडीचा फायदा होऊ शकतो.मुंबई-कुडाळ-मुंबई विशेष ट्रेन कधी सुटणार?रेल्वे क्रमांक 01103/ मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कुडाळ ही गाडी मुंबईहून दुपारी साडेतीन वाजता आज म्हणजेच 4 सप्टेंबर आणि 6 सप्टेंबरला सुटेल. दुसऱ्या दिवशी पहाटे साडेतीन वाजता ही गाडी कुडाळला पोहोचेल.कुडाळ रेल्वे क्रमांक 01104 कुडाळ- मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ही गाडी कुडाळ येथून 5 आणि 7 सप्टेंबरला पहाटे साडे चार वाजता सुटेल आणि मुंबईत त्याच दिवशी सायंकाळी 4 वाजून 40 मिनिटांनी पोहोचेल.कोणत्या स्थानकांवर गाडी थांबणार?दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, कामाठे, सावर्डा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग या स्थानकांवर ही विशेष ट्रेन थांबणार आहेत.या गाडीला एकूण 20 कोच असतील त्यापैकी 14 कोच जनरल असतील चर चार कोच स्लीपरचे असतील. या गाडी संदर्भात अधिक माहितीसाठी रेल्वेच्या वेबसाईटला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ही गणपती विशेष ट्रेन अनारक्षित असल्यानं याची तिकीट आयरसीटीसीच्या तिकीट बुकिंग वेबसाईटवर उपलब्ध होणार नाहीत. ती यूटीएस अॅप किंवा रेल्वे स्टेशनवरील तिकीट बुकिंगच्या खिडकीवर मिळतील.